Amazon

Sunday, October 3, 2021

जोतिबांचे लेक : स्त्री सन्मानासाठी

 

हरियाणातील जिंद जिल्ह्य़ातील बीबीपूर या सुमारे ५००० लोकवस्तीच्या गावात सुनील राहात आहे.

हरीश सदानी

स्वत:च्या मुलीच्या जन्माच्या वेळी सरपंच सुनील यांच्या लक्षात आलं, की स्त्रीभ्रूण हत्येचा शाप असलेल्या आपल्या गावामध्ये मुलींची संख्या खूपच कमी आहे.  स्त्रीअस्तित्वालाच सुरुंग लावणाऱ्या या एका घटनेनं त्यांना पूर्णपणे बदलून टाकलं. त्यांनी स्त्रियांसाठी ग्रामसभा आयोजित के ली आणि एकामागोमाग एक उपक्रम सुरू झाले. लाडो पुस्तकालय, डिजिटल इंडिया विथ लाडो, सेल्फी विथ लाडो, लाडो स्वाभिमान उत्सव, लाडो राइट्स अशा अनेक उपक्रमांमुळे हरियाणातील जिंद जिल्ह्य़ातील बीबीपूरची दखल थेट राष्ट्रपतींनी घेतली आणि आज हे गाव सर्वच बाबतीत प्रगतिपथावर आहे. २६ व्या वर्षी सरपंच झालेल्या आणि आज गेली ११ वर्षे स्त्रीसन्मानासाठी काम करणाऱ्या या जोतिबांच्या लेकाचं, सुनील जागलान यांचं हे कार्यकर्तृत्व..  

स्त्रियांच्या सन्मानानं व सुरक्षितपणे जगण्याच्या हक्काच्या रक्षणासाठी त्यांच्या आयुष्यातील पुरुषही मोलाची भूमिका बजावू शकतात- वैयक्तिक पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवरही. जर तो पुरुष राज्यसंस्थेचा, प्रशासकीय सेवेचा एक महत्त्वपूर्ण घटक असेल, तर स्वत:कडे असणाऱ्या सत्ता, सामर्थ्यांच्या जोरावर नागरिकांचं आयुष्य उंचावण्यामध्ये तो ठोस पावलं नक्की उचलू शकतो. अशीच पावलं हरियाणातील एका माजी सरपंचानं सातत्यानं आणि प्रभावीरीत्या उचलली आणि आपल्या गावातील स्त्रियांना सन्मानानं जगू देण्यासाठीची त्याची धडपड गेली ११ वर्ष चालू आहे. या सुनील जागलान यांचे,  ३८ वर्षांच्या तडफदार माजी सरपंचाचे हे प्रयत्न नक्कीच जाणून घेण्यासारखे आहेत.

हरियाणातील जिंद जिल्ह्य़ातील बीबीपूर या सुमारे ५००० लोकवस्तीच्या गावात सुनील राहात आहे. ‘एमएस्सी’चं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुनीलला गणित आणि व्यवस्थापकीय बाबींमध्ये रस होता. २००७ मध्ये स्वत: सुरू केलेल्या कोचिंग इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवण्याचं काम  करताना त्याला एका शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालयात थेट संचालकपदाची नोकरी मिळाली. पहाटे ५ वाजता कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सुनीलनं जास्तीत जास्त पैसे कमावण्याचा ध्यास आणि त्यासाठी काम एके काम असा दिनक्रम अंगीकारला.

एकदा गावात रस्ता बांधण्यासाठी गावच्या उपायुक्तास भेटून अर्ज देण्याची विनंती काही गावकऱ्यांनी सुनीलकडे केली. सुनीलनं स्वत: जाऊन तो अर्ज देऊनही काही प्रतिसाद न मिळाल्याने त्या अर्जाचा पाठपुरावा सुरू केला. त्याच्या या चिकाटीनं रस्तेबांधणीसाठी २५ लाख रुपये मंजूर झाले. गावातील अनेकांनी सुनीलचं व्यवस्थापकीय कौशल्य ओळखून त्याला गावचा सरपंच होण्याचा आग्रह केला. सुनीलनं सुरुवातीला हे फारसं गांभीर्यानं न घेताच सरपंचपदासाठी तयारी केली आणि ५५० मतं अधिक मिळवून २६ वर्षीय सुनील देशातील सर्वात तरुण सरपंच झाला. त्यानं ६ जून २०१० रोजी पदभार स्वीकारला.

‘मिशन पॉसिबल- गांव बने शहर से सुंदर’ या घोषणेसह सुनील काम करू लागला. बीबीपूर गावात मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, बागा, नागरिकांसाठी सौरऊर्जा, स्वच्छता मोहीम या सुविधा देण्याबरोबरच ऑनलाइन माध्यमाद्वारे (आरटीआय) माहिती पुरवण्यात, ग्रामपंचायतीचं संके तस्थळ बनवण्यात, ऑनलाइन ग्रामसभा घेण्यात त्यानं पुढाकार घेतला.  २४ जानेवारी २०१२ च्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात त्याच्या बायकोनं एका बाळाला जन्म दिला. ‘बेटी हुई हैं,’ असं एक परिचारिका हलक्या आवाजात सुनीलला सांगायला आली. आनंदी झालेल्या सुनीलनं दुसऱ्या दिवशी रुग्णालयात सर्वाना मिठाई वाटण्यासाठी २००० रुपये परिचारिके ला देऊ केले. तिनं ते घेण्यास नकार दिला. ती म्हणाली, ‘‘मुलगा जन्मला असता तर यापेक्षा जास्त पैसे घेतले असते. मी तुमच्याकडून मुलगी जन्मल्यानंतर ज्यादा पैसे घेतले, असं डॉक्टरांना कळलं, तर ते रागावतील!’’ परिचारिके च्या प्रतिक्रियेनं गोंधळात पडलेल्या सुनीलनं दुसऱ्या दिवशी घराजवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन पाहाणी केली. २०११ च्या जनगणनेनुसार हरियाणा राज्याचं स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) देशात सर्वात कमी- म्हणजे दर १००० मुलग्यांमागे ८७९ मुली, अशी नोंद असल्याचं सुनीलला कळलं. बीबीपूर गावाच्या बाबतीत हे प्रमाण दर हजार मुलांमागे ८६७ मुली इतकं कमी होतं. स्त्री अर्भकांच्या हत्या  थांबवण्यासाठी गावातील स्त्रियांना जागरूक करून बोलतं करण्याकरिता सुनीलनं १८ जून २०१२ रोजी महिला ग्रामसभा  घेतली. त्यात २५० स्त्रिया जमल्या. या घटनेद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या सरकारी अभियानाची आधारभूत सुरुवात बीबीपूर येथे झाली असल्याचं सुनील नम्रपणे नमूद करतो.

न जन्मलेल्या मुलींच्या अस्तित्वाचा प्रश्न हा समाजात एकंदरीत स्त्रिया किती सन्मानानं, सुरक्षितपणे वावरत आहेत याच्याशी थेट निगडित आहे. घरात व घराबाहेर निर्धास्त, आत्मविश्वासानं त्या वावरू लागल्या तर स्त्रीजन्माचं स्वागत होण्याच्या दिशेनं ते आश्वासक पाऊल ठरेल, हे सुनीलनं ओळखलं. स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र येऊन याविषयावर खुलेपणानं बोलावं, यासाठी केवळ हरियाणा नव्हे, तर पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान इथल्या खाप पंचायतीच्या प्रतिनिधींना बोलावून महाखाप पंचायत आयोजित करण्याचं सुनीलनं ठरवलं. यात स्त्रिया मोठय़ा प्रमाणात येऊन बोलल्या पाहिजेत, यासाठी गावातील प्रत्येक घरात जाऊन आवाहन केलं गेलं. मात्र अनेक खाप पुढाऱ्यांनी स्त्रियांच्या सहभागाविषयी आक्षेप नोंदवला. खाप पंचायतीच्या कुठल्याही बैठकीला किंवा ‘चौपाल’मध्ये फक्त पुरुषच भाग घेऊ शकतात असा वर्षांनुवर्षं चालत आलेला संकेत असल्याचं सुनीलला अनेक बुजुर्गानी सुनावलं. मुलींची घटती संख्या, कौटुंबिक हिंसाचार या स्त्रियांशी थेट संबंधित मुद्दय़ांवर स्त्रियांना नेमकं काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेतल्याशिवाय ते प्रश्न कसे सुटू शकतात, असा सवाल करत सुनीलनं जिद्दीनं स्त्रियांच्या सहभागाबद्दल आग्रह धरला. १४ जुलै २०१२ रोजी बीबीपूर येथे भरलेली महाखाप पंचायत अद्वितीय ठरली. हरियाणा आणि शेजारच्या राज्यातील १३० खाप पंचायतींमधील प्रतिनिधी तिथे उपस्थित होते आणि लक्षणीय संख्येनं स्त्रियाही. ऐतिहासिक ठरलेल्या या उपक्रमामध्ये पहिल्यांदा एका मंचावर मुली, सुना जमल्या. ‘वंश चालवण्यासाठी मुलगाच हवा’ यासाठी कुटुंबीयांकडून येणाऱ्या दडपणापासून स्त्रियांना संपत्तीत असणाऱ्या हक्कापर्यंत अनेक विषयांवर या स्त्रिया हिरिरीनं बोलल्या. पूर्णत: घुंघटमध्ये असलेल्या ९२ वर्षांच्या संतोष देवी उद्गारल्या, ‘‘१६ व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मी स्वत:साठी जगलेच नाही. सतत दुसऱ्यांचं ओझं वाहात आले. मला आता परिवर्तन हवंय. स्वत:साठी आणि गावातील तरुण मुलींसाठी!’’ संतोष देवी बोलत असलेल्या माईकची वायर कापून सभा उद्ध्वस्त करण्याचा डाव काही विरोधकांनी आखला होता. पण अशाही स्थितीत आसपासच्या नीरव शांततेत त्यांचा आवाज सर्वत्र घुमत राहिला होता, असं सुनील कथन करतो.

या अभूतपूर्व महाखाप पंचायतीच्या आयोजनानंतर सुनीलनं गर्भवती स्त्रियांच्या निगराणीकरिता ज्येष्ठ स्त्रियांचा एक गट तयार के ला. कुठल्याही दडपणाखाली कोणी बेकायदेशीररीत्या गर्भपात करत नाही ना, याबद्दल दक्ष राहाण्याबरोबरच मुलींच्या घसरत्या जन्मदराविषयी जाणीव-जागृतीचे अनेक कार्यक्रम गावात आयोजित करण्यात आले. लाडो पुस्तकालय, लाडो सरोवर, स्त्रियांना एकत्र जमून बैठक घेण्यासाठी चबुतरा बांधण्यात आला. या सर्व प्रयत्नांनी गावात पहिल्यांदा मुलींची संख्या २०१३ आणि त्यापुढील वर्षांत वाढत गेली. सुनीलच्या स्त्री-सक्षमीकरणाच्या आगळ्या उपक्रमांची दखल घेऊन राष्ट्रीय गौरव पुरस्कार, तसंच हरियाणा सरकारकडून एक कोटी रुपयांचं पारितोषिक देऊन त्याला सन्मानित केलं गेलं. ९ जून २०१५ रोजी सुनीलच्या घरी टीव्हीवर सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘सेल्फी ले ले रे’ गाणं सुरू होतं. त्याची मोठी मुलगी नंदिनी फोनच्या कॅमेऱ्यावर स्वत:चा फोटो काढत होती. तरुणाईला असणारं ‘सेल्फी’चं वेड लक्षात घेऊन त्यानं ‘सेल्फी विथ डॉटर’ अभियान सुरू केलं. आई-वडिलांनी मुलींसोबत काढलेले सेल्फी पाठवण्याचं आवाहन केलं. एका आठवडय़ात असे ७९४ सेल्फी (अगदी प्रसिद्ध खेळाडू सायना नेहवाल, गीता फोगट यांच्यासह) सुनीलच्या मोबाइलवर पाठवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत या अभियानाची माहिती पोहोचली आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली.

यानंतर ‘डिजिटल इंडिया विथ लाडो’ उपक्रमाअंतर्गत सुनीलनं घराबाहेरची नावाची पाटी मुलींच्या नावानं करण्यासाठी मोहीम राबवली. ‘ईशा निवास’, ‘जैनम निवास’ अशा  मुलींच्या नावांच्या पाटय़ा घराबाहेर झळकायला सुरुवात झाली.  बीबीपूरच्या ३० घरांपासून सुरू झालेली ही मोहीम राज्यात हळूहळू अनेक लोकांनी स्वेच्छेनं अंगीकारली. सध्या हरियाणा आणि इतर राज्यांत १५,००० घरांवर अशी मुलींच्या नावांची ‘नेमप्लेट’ लावण्यात सुनील यशस्वी झाला आहे. ‘लाडो स्वाभिमान उत्सवा’चा भाग म्हणून कुटुंबातील पुरुषानं आपल्या मुलीला वा नातीला पगडी बांधण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. यात ५ वर्षांपासून सुनीलच्या कामाशी जोडलेल्या सुमारे ३५० पुरुषांनी आपापल्या मुलींच्या/ नातींच्या डोक्यावर पगडी बांधली. हा उपक्रम वरकरणी प्रतीकात्मक वाटत असला तरी पगडीचं महत्त्व मानणाऱ्या हरियाणवी लोकांमध्ये ‘लक्षणीय संख्येनं मुलींना सन्मान देणारे पुरुष’ या मुद्यावर गावागावांत चर्चा घडवण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरली हे विशेष.

जानेवारी २०१६ मध्ये सुनीलचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपला तरी त्याचं काम सुरूच होतं.  तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सुनीलच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी बीबीपूरच्या ग्रामविकास व महिला सक्षमीकरण मॉडेलचं हरियाणातील १०० गावांमध्ये ‘स्मार्टग्राम’मध्ये रूपांतराकरिता ५० लाखांचं अर्थसहाय्य सुनीलला दिलं. तसंच राष्ट्रपती भवन येथे ‘सेल्फी विथ डॉटर फाऊंडेशन’च्या उद्घाटनासाठी त्याला निमंत्रित केलं. विभा बक्षीनं २०१९ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘सनराइझ’ या माहितीपटात सुनीलच्या कामाचं ठळक चित्रण आहे. हा माहितीपट सध्या ‘यूएन विमेन’च्या ‘ही फॉर शी’ अभियानांतर्गत जगभरात सिनेमहोत्सवांमध्ये सादर केला जातो.

आता सुनील ३८ वर्षांचे आहेत. सध्या ‘प्रणब मुखर्जी फाऊंडेशन’मध्ये सल्लागार म्हणून, तसंच स्वत:च्या संस्थेमार्फत सुनील हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान येथे कार्यरत आहेत. स्त्रियांच्या हक्कांविषयी ‘लाडो राइट्स’ पुस्तक प्रसिद्ध करून अनेक ठिकाणी वितरित करून जागरूकता निर्माण करणं, ‘पीरिअड चार्ट’ घराघरात लावून मासिक पाळीला दैनंदिन चर्चेचा विषय बनवणं, अनेक गावात लाडो पुस्तकालय, संगणक केंद्र सुरु करून, मोबाइल फोन भेट देऊन मुलींच्या कक्षा रुंदावणं, राज्याराज्यांतील सरपंचांना ऑनलाइन पद्धतीनं जोडून घेऊन मार्गदर्शन करणं हे त्यांचं अथकपणे चालूच आहे. ५ वर्षांचा कार्यकाळ आणि त्यापुढे जाऊन एक माजी सरपंच काय विधायक, रचनात्मक कार्य करू शकतो याचा एक वस्तुपाठच सुनील जागलान यांनी घालून दिला आहे.

saharsh267@gmail.com

Ref :loksatta 




Saturday, October 2, 2021

बहरू कळियांसि…?

 आपली हवा कशी आहे? ती तशी का आहे? अशा चौकशा न करता ‘दोष ना कोणाचा!’ हेच परमसत्य मानून ‘पराधीनांचं’ हवापाणी चाललं होतं.

|| अतुल देऊळगावकर 

लंडनच्या अतिप्रदूषित वस्तीत राहणाऱ्या एला अडू किसी देब्रा या नऊ वर्षांच्या मुलीचा दम्यामुळे २०१३ साली मृत्यू झाला. एलाच्या आई राजमंड यांनी ‘माझ्या मुलीचा आजार व मृत्यू यासाठी वायुप्रदूषणच जबाबदार आहे,’ असा आरोप करून लंडनच्या न्यायालयात त्यासंबंधात दाद मागितली. न्यायासाठी त्यांनी आजवर अथक लढा दिला. आणि आता एलाला न्याय मिळण्याची घटिका जवळ आली आहे…

मृणाल सेन यांच्या ‘खारीज’ (‘बंद केलेला खटला’) चित्रपटात (१९८२) कोलकात्याच्या चाळीत राहणारं एक मध्यमवर्गीय जोडपं त्यांच्या मुलाला सांभाळण्यासाठी एक दहा वर्षांचा मुलगा गडी म्हणून आणतात. एके रात्री प्रचंड थंडी पडल्यावर तो जिन्याखालची नेहमीची जागा सोडून स्वयंपाकघरात झोपायला जातो. शेगडीची ऊब घेऊन झोपतो. सकाळी उठल्यावर जोडप्याला बंद स्वयंपाकघर उघडता न आल्यामुळे ते फोडावं लागतं. आतमध्ये तो मुलगा मृत्यू पावला असल्याचं लक्षात येतं. त्यावरून अनेक शंकांना उधाण येतं. विविध गटांच्या छटांनुसार निरनिराळे ‘सिद्धांत’ मांडले जातात. त्या मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वत:च्या घरात काम करणाऱ्या मुलाचं गाव व पत्तासुद्धा माहीत नसतो. मग त्या परिसरातील घरगड्यांकडे विचारपूस करत त्याच्या गावी जाऊन वडिलांना निरोप दिला जातो. इकडे शवविच्छेदनानंतर समजतं की, शेगडीतून येणाऱ्या धुरातून कार्बनमोनोक्साइड श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाच्या मरणाची बातमी पसरल्यावर त्या भागातील झोपडपट्टीत राहणारे कष्टकरी जमू लागतात. हे आक्रमण मानून त्यांच्याविरुद्ध मध्यमवर्गीय लोक एकवटून वातावरणात तणाव निर्माण होतो. ते जोडपं अपराधी भाव, पोलीस भीती, आरोपाचा प्रतिकार या भावभावनांतून जात राहतं. अखेरीस मुलाचे वडील अंत्यसंस्कार करून येतात. मालकाला नमस्कार करून निघून जातात. आणि खटला उभा राहण्याआधीच संपून जातो.

१९८० च्या दशकात मध्यमवर्गीयांची आर्थिक आगेकूच सुरू झाल्यामुळे त्यांना घरकाम, स्वयंपाक व इतर कामांसाठी गडी ठेवणं ‘परवडू’ लागलं होतं. त्याचवेळी आपल्यासाठी कष्ट करणाऱ्यांची कोणतीही जबाबदारी न स्वीकारण्याचा बाणाही त्यांच्या अंगी शिरला होता. प्रस्थापितांच्या वाढत्या साम्राज्यासाठी विस्थापितांच्या कष्टांची गरज आहे, कामापुरते व तितकेच नाते असा उपयोगितावाद रुजतो आहे… अशा विदारक अवस्थेतील एका वास्तव घटनेला मृणाल सेन यांनी बहुविध पातळ्यांवर नेऊन आपल्याला अस्वस्थ केलं. त्या मध्यमवर्गीय परिवाराकडून थेट गुन्हा घडलेला नाही. परंतु राबराब राबणाऱ्या कष्टकऱ्यांना जिन्याखाली वा सोयी नसलेल्या गलिच्छ वस्तीत राहावं लागतं. कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीत सर्वात आधी बळी त्यांचाच जातो. स्वत:ला सुसंस्कृत मानणाऱ्या मध्यमवर्गीयांची ‘माणुसकी’ ही निवडक व दांभिक आहे. संवेदनशीलता हद्दपार करीत पुढे निघालेल्या मध्यमवर्गीयांचं बिंब-प्रतिबिंब आणि त्याचवेळी कष्टकऱ्यांना मिळणाऱ्या ‘न्याया’चं स्वरूप दाखवण्याचं कार्य सेन यांनी या चित्रपटात केलं.

या चित्रपटातील काळाला ४० वर्षं उलटून गेली आहेत. दरम्यानच्या काळात शहरे, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीय या सर्वांच्या संख्या गुणाकाराने वाढत गेल्या. या शहरांतून शाही, आलिशान, साधारण व सुमार अशा तऱ्हतऱ्हेच्या आवासांचा विकास क्रमश: चालू आहे. शहरांसाठी लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन व सेवा देण्यास देशाच्या कानाकोपऱ्यांतील खेडूत शहरातील (पर्यावरणीय) निर्वासित होत आहेत. आता मरणासाठी बंद खोलीत जाऊन गुदमरण्याची गरजच नाही. ते कार्य शहरातील खुली हवाच सक्षमपणे करत आहे. जात-धर्म-वर्ग-भाषा-प्रदेश अशी क्षुद्र बंधनं न जुमानणारी ही हवा तुलनेने गरिबांच्याच वाट्याला अधिक येते. २०१७ साली भारताच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ‘हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू व आजार’ यांचा एक व्यापक अहवाल तयार केला होता. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अहवालात ‘भारतात दरवर्षी १२.४ लक्ष लोक प्रदूषित हवेचे बळी जातात. भारतामधील प्रत्येक आठवा मृत्यू हा विषारी हवेमुळे होतो. हृदयविकाराचा वा मज्जासंस्थेचा झटका, कर्करोग, फुप्फुसाचे विकार, श्वसनयंत्रणेचे आजार यासाठी ही हवा जबाबदार आहे. प्रत्येक राज्याला पडलेला विषारी वायूंचा विळखा व त्याचे बळी वाढतच आहेत’ असं म्हटलं होतं.

आपली हवा कशी आहे? ती तशी का आहे? अशा चौकशा न करता ‘दोष ना कोणाचा!’ हेच परमसत्य मानून ‘पराधीनांचं’ हवापाणी चाललं होतं. जगभरातही अशीच रीत होती. पण आता लंडनमधील एका बालिकेच्या मृत्यूच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ‘न्यायात’ व कायद्यात बदल करावा लागत आहे. ही बालिका जगातील हवाप्रदूषण बळींचं प्रतीक होत असल्यामुळे जगातील ‘न्याय’ बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रिटनच्या न्यायालयानं ऐतिहासिक निर्णयातून ‘विषारी हवेस स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवलं’ असल्याचा उल्लेख ‘लोकसत्ता’मध्ये (‘लोकरंग’, २० डिसेंबर २०२०) केला होता. लंडनच्या गरिबीनं ग्रासलेल्या अतिप्रदूषित वस्तीत राहणाऱ्या एला अडू किसी देब्रा या नऊ वर्षांच्या मुलीला दम्याच्या विकारामुळे तीन वर्षांत ३० वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. २०१३ साली ती मरण पावली. एलाच्या आई राजमंड यांनी ‘माझ्या मुलीचा आजार व मृत्यू यासाठी प्रदूषणच जबाबदार आहे,’ असा आरोप करून लंडनच्या न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, २०१८ मध्ये ‘दम्यामुळे श्वसनयंत्रणा निकामी होऊन एला दगावली’ असा निकाल देऊन खटला संपवला गेला होता. पण रोजमंड यांनी निराश न होता स्वयंसेवी संस्था, वैज्ञानिक व वकील यांच्या मदतीने सज्जड पुराव्यानिशी नव्यानं आरोपपत्र दाखल केलं. परिणामी २०२० च्या डिसेंबरमध्ये एलाच्या मृत्यू प्रमाणपत्रात बदल करून त्यामध्ये ‘दूषित हवेमुळे एलाचा मृत्यू झाला’ असं स्पष्टपणे नमूद केलं गेलं. त्यानंतर न्यायालयाने ‘एला ही हवेच्या प्रदूषणाची बळी आहे,’ असं घोषित केलं. जगाच्या इतिहासात प्रथमच हवाप्रदूषणाचा बळी व त्याची जबाबदारी ठरविण्याचा निवाडा झाला.

संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या एलाच्या खटल्याची प्रदीर्घ सुनावणी अजूनही चालूच आहे. कायदा व आरोग्य क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञांची मते घेतली जात आहेत. यानिमित्ताने एखाद्या मृत्यूची सखोल चौकशी कशी असते याचा नमुना जगासमोर येत असून, त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येत आहे. तिथल्या श्वसन व फुप्फुस विकार तसेच सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञांनी ‘हवा छानच आहे. विकार असलेल्या व्यक्ती दगावतच असतात. कधी आकस्मिक मृत्यू होतात,’ असं न सांगता आपल्या सरकारी यंत्रणेचं वस्त्रहरण केलं. त्यांच्या तज्ज्ञांनी ‘ब्रिटनमध्ये दरसाल २८,००० ते ३०,००० हवाप्रदूषणाचे बळी जातात. दक्षिण लंडनमधील दक्षिण वळणरस्त्याजवळ राहणाऱ्या एलाचा परिवार हा हवाप्रदूषणाच्या अतिशय घातक पातळीला सामोरा जात होता. ही दूषित हवा एलाच्या दम्यास व मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. ब्रिटनमधील सूक्ष्म घन कणांची (पीएम २.५) मर्यादा ही जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा अडीच पटीने अधिक आहे. हेच सूक्ष्म कण फुप्फुसात खोलवर जाऊन प्राणघातक ठरतात. एकंदरीतच ब्रिटनमधील हवा व पर्यावरणविषयक कायदे व त्यांचं नियमन यांचा नव्याने विचार होणं आवश्यक आहे,’ असं ठणकावून सांगितलं. (शासकीय यंत्रणा वाकल्या नाहीत तर त्यांचा असा धाक असू शकतो.)

येत्या नोव्हेंबरमध्ये ब्रिटनच्या ग्लासगो शहरात जागतिक हवामान परिषद भरणार असून, त्याआधी त्यांना प्रदूषणमुक्तीकडे जाण्याची इच्छा आहे. ‘स्वच्छ हवेचा काळानुरूप कायदा’ व त्याच्या अंमलबजावणीची निकड ही त्यासाठी आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञ, विधीज्ञ व स्वयंसेवी संघटनांचा ‘नव्या कायद्याचे ‘एला कायदा’ असे नामकरण व्हावे,’ असा आग्रह आहे. या मागणीला जनतेचा भरघोस र्पांठबा मिळत आहे. हाडाच्या शिक्षिका असलेल्या एलाच्या आई रोजमंड गेली सात वर्षें हवेच्या प्रदूषणाविषयी जागरूकता वाढवत आहेत. त्या म्हणतात, ‘प्रदूषित हवेमुळे दरवर्षी हजारो बालकांचं आणि कुटुंबांचं हास्य हिरावून घेतलं जात आहे. ६५ लाख लोकांना श्वसनाचे विकार होत आहेत. दम्यामुळे बालकांचं मरण ओढवू द्यायचं नसेल तर सरकारनं दोन-पाच वर्षं अशी मुदत न देता तात्काळ कारवाई करणं अनिवार्य आहे.’ सरकारी प्रवक्ताही संवेदनशीलता दाखवीत म्हणाले, ‘एलाचे कुटुंब व आप्त यांना होत असलेल्या मानसिक यातनांमुळे आम्हीही व्यथित आहोत. न्यायालयात सादर होणाऱ्या सर्व शिफारशी व अहवाल यांचा गांभीर्याने विचार करून कृती करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. सार्वजनिक वाहतूक सुधारणा करणे, कर्ब व नायट्रोजन वायूंचे तसेच सूक्ष्म घन कणांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी ३.८ अब्ज पौंडांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.’

एलाच्या मृत्यूचा न्यायालयीन खटला हा पर्यावरण चळवळीतील वळर्णंबदू ठरत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज, जागतिक आरोग्य संघटना या संस्थांच्या बैठकांमध्ये हवामान बळींतील बालकांच्या संख्येविषयीची चर्चा वाढली आहे. जागतिक वैज्ञानिक संस्था व अनेक आरोग्यतज्ज्ञांनी परखडपणे सांगितलं आहे- ‘हवेचं प्रदूषण अधिक असणाऱ्या भागात करोनाचे रुग्ण व मृत्युसंख्याही अधिक आहे.’ त्यामुळे महासाथी रोखण्यासाठी पर्यावरणरक्षणाचा नव्याने विचार व कृतीआराखडा देण्यावर मंथन चालू आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ‘हवामान हेच महत्त्वपूर्ण आहे…’ अशी घोषणा करून त्यांनी पर्यावरणकेंद्री अर्थधोरणाकडे वाटचाल चालू केली आहे. आगामी हवामान परिषद ही निर्णायक व दशकाला दिशा देणारी ठरावी याकरिता बायडेन हे कसून प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अमेरिकेची कर्बकेंद्री अर्थव्यवस्था हरित करताना पायाभूत संरचना तयार करण्यासाठी २.६५ ट्रिलियन डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वाहतूक, वाहने, घरबांधणी यांना प्राधान्य देऊन नवीन हरित रोजगार निर्माण करण्यास चालना दिली जाणार आहे. अशी ठोस कृती केल्यानंतरच बायडेन यांनी वसुंधरादिनी दूरदृश्यप्रणाली माध्यमाद्वारे ४० राष्ट्रप्रमुखांची परिषद आयोजित केली. त्यांनी ‘मतभेद बाजूला ठेवून पुढील पिढ्यांच्या उत्तम भविष्यासाठी कर्बउत्सर्जन कमी केलंच पाहिजे. त्यासाठी निधी व तंत्रज्ञान उपलब्ध करून सारे अडथळे दूर सारणं गरजेचं आहे,’ हे आवर्जून सांगितलं. या परिषदेत अमेरिका व युरोपीय महासंघाने २०५० पर्यंत, तर चीनने २०६० पर्यंत कर्बमुक्त होण्याचं आश्वासन दिलं. भारतासह सर्व सहभागी राष्ट्रांनी कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठीचा आराखडा सादर केला. अनेक वित्तीय संस्थांनी कर्बमुक्त तंत्रज्ञानासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. अमेरिकेसह अनेक देशांना या उद्दिष्टपूर्तीसाठी देशांतर्गत व बाह्य दोन्ही अडथळ्यांच्या शर्यतीतून जावं लागणार आहे. तूर्तास नोव्हेंबरमधील जागतिक हवामान परिषदेसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. ‘टाइम’, ‘बी. बी. सी.’ आणि ‘द इकॉनॉमिस्ट’ यांसारख्या अग्रगण्य नियतकालिकांनी ‘बायडेन धोरणा’ची ‘आवरणकथा’ करून सन्मान व्यक्तकेला आहे. १९३२ च्या आर्थिक मंदीत अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी ‘नवा करार’ आणून पायाभूत संरचनेत भरीव गुंतवणूक करीत रोजगार निर्माण केले. प्रसिद्धी माध्यमांतून रुझवेल्ट यांची कर्तबगारी आणि बायडेन यांचा ‘नवा हरित करार’ अमलात आणण्याचा धडाका यांच्यातील साम्यस्थळे दाखविली जात आहेत. तर काही जण बायडेन यांना मिळू शकणाऱ्या स्वातंत्र्याबाबत साशंक आहेत.

या पार्श्वभूमीवर आपण आपल्याकडे पाहिलं तर…? नुकताच जागतिक हवाप्रदूषणासंबंधीचा ‘वर्ल्ड एअर क्वालिटी २०२०’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात जगातील ३० अतिशय प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असल्याचं दिसून आलं आहे. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराख, जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मेरठ, आग्रा आणि मुझफ्फरनगर, तर राजस्थानमधील भिवारी, हरियाणातील फरिदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहटक व धारुहरा आणि बिहारमधील मुजफ्फरपूर यांचा समावेश आहे. या व अशा शहरांमधील हवा सोसणाऱ्या बालकांची व वृद्धांची अवस्था कशी असेल? त्यांना न्याय मिळवून देण्याची अभिमानास्पद घटना आपल्याला अनुभवता येईल?

आपल्या देशातील १०२ शहरांमधील हवेतील १० मायक्रॉनहून कमी आकाराच्या सूक्ष्म धूलीकणांचं (पी. एम. १०) प्रमाण वाढत असल्यामुळे २०१९ च्या जानेवारीमध्ये केंद्र सरकारने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ जाहीर केला होता. या शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याचा आराखडा देण्यास सांगितलं होतं. त्या १०२ शहरांपैकी १८ शहरे महाराष्ट्रातील होती. २०२१ च्या मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या १८ शहरांच्या हवेचा दर्जा जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, जालना, लातूर, नागपूर, चंद्रपूर व कोल्हापूर या नऊ शहरांमधील हवेची गुणवत्ता वरचेवर ढासळत असल्याचं त्यात स्पष्ट झालं आहे.

राज्याचे व देशाचे पर्यावरणमंत्री आपल्या वाट्याला येणाऱ्या हवेतील ‘दुर्गुण’ कोणते व त्यास कोण जबाबदार हे सांगू शकतील? प्रदूषकांना कधीतरी शिक्षा मिळेल अशी आशा करता येईल? देशातील व राज्यातील प्रदूषणामुळे होणाऱ्या विकारांवर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ काही प्रकाश टाकेल? या ‘जर-तर’वर असंख्य कळ्यांचा बहर अवलंबून आहे.

एलाची हसरी छबी घेऊन ब्रिटिश जनता न्याय मागताना ‘यानंतर एलासारखा मृत्यू नको’ असा इशारा सरकारला देत आहे. काही दिवसांत लंडनमधील न्यायालय स्थानिक व राज्य प्रशासनाला एलाच्या मृत्यूची भरपाई सुनावणार आहे. हे वाचताना गलिच्छ हवेने भरून गेलेल्या आपल्या शहरांमधील लाखो बालकांचं निरागस हास्य डोळ्यांसमोर येत राहतं. त्याचवेळी आठवतात- भोपाळच्या वायुपीडितांसाठी अथक लढलेले अब्दुल जब्बार! ३ डिसेंबर १९८४ ला भोपाळच्या युनियन कार्बाईड कारखान्यातील वायुदुर्घटनेमुळे ५००० लोक बळी गेले. नंतरही वायूच्या दुष्परिणामांमुळे रोज किमान तीन जण दगावत होते. ‘भोपाळदिनी’ आपापल्या मृत नातेवाईकांची छायाचित्रं घेऊन हजारो वायुग्रस्त शाहजहान उद्यानात जमत असत. जब्बार म्हणायचे, ‘भोपाळला वायुकांड एकदाच झालं. आता शेकडो शहरांत सदासर्वकाळ ‘शांतता! वायुकांड चालू आहे.’ आज आपण आहोत. पुढच्या वर्षी आपलं छायाचित्र घेऊन दुसरं कोणीतरी येईल.’

atul.deulgaonkar@gmail.com 

Ref: Loksatta




उद्योजिका घडतील, पण…



 


पार्वतीताई माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, ‘‘ताई, आज मी ‘डाळ मिल’ घेतली त्याला एक वर्ष पूर्ण झालं.  मी रोज या ‘डाळ मिल’मधून जवळजवळ सहाशे किलो कडधान्याची डाळ तयार करते. आज माझं घर त्याच्यावरच चाललेलं आहे. मी माझ्या मुलीचं शिक्षणही यातूनच पूर्ण केलं. आज ती नोकरीलाही लागली. वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मला पूजा करायची आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या घरी या.’’ मी पार्वतीताईंच्या घरी ‘डाळ मिल’ पाहायला गेले.  त्यांचा अनुभव    ऐकू न मलाही खरंच उत्साह वाटत होता. पार्वतीताई म्हणाल्या,  या ‘डाळ मिल’ची एकू ण क्षमता जवळजवळ एक हजार किलोपेक्षा जास्त आहे.’ माझ्याशी बोलत असताना त्या स्वत: मशीनमधून डाळ तयार करत होत्या. तेवढ्यात चार स्त्रिया स्वत:ची मटकी घेऊन त्याची डाळ बनवण्यासाठी आल्या. पार्वतीताईंनी सांगितलं, की ‘असं रोजच स्त्रिया कडधान्य घेऊन येतात. मी ते भिजत घालून वाळत घालते आणि नंतर डाळ करते. ही माझी रोजची दिनचर्या असते. माझं काम वाढत चाललं आहे. सणाच्या वेळी रोजची हजार किलो डाळ काढते. मला एक चांगला उद्योग मिळाला आहे.’

मी त्यांना म्हटलं, ‘तुमची मुलगी नोकरी करते, तर तिचाही पगार येत असेल घरी. मग ‘डाळ मिल’ का चालवता?’

पार्वतीताई म्हणाल्या,‘या ‘डाळ मिल’नं एक वेगळी ओळख दिली आहे मला.  माझा कष्टाचा धर्म आणि डाळ करायचं कर्म! आता मरेपर्यंत ही मिल चालवणार!’

मी विचारलं, ‘ओळख दिली म्हणजे नेमकं काय दिलं?’ त्या म्हणाल्या,‘‘लग्न झाल्यानंतर मी इथे आले. घरी सासरे शिक्षक होते. थोडीफार जमीन होती, पण सासऱ्यांना दारू प्यायची सवय होती. पतीलाही दारू प्यायची सवय लागली. जेव्हा माझ्या नणंदेचं लग्न ठरलं. त्या वेळी लग्नाच्या आधी आम्ही हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. पण आमच्या घरी कोणीही स्त्री हळदीकुंकवाला आली नाही. ना शेजारपाजारची ना नातेवाईक. माझी सासू आणि मी, आम्हाला खूप वाईट वाटले. घरातले दोन पुरुष सतत दारू पीत बसत असतील तर कोण येणार घरी! त्यानंतर मी ठरवलं, की घरातला सगळा प्रपंच आपल्या हातात घ्यायचा. माझ्या सासूबाईंनीही मला साथ दिली. मी स्वत: कराडला गेले. तिथे मला ‘डाळ मिल’ची माहिती मिळाली. घरच्या घरी छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी मला हा योग्य मार्ग वाटला. मात्र हाताशी पैसे नव्हते. बँकेतून कर्ज घेतलं आणि अडीच लाख रुपयांना मशीन विकत घेतलं. पण मला ती चालवायला जमेना. मग मशीन ज्यांनी विकली होती त्यांना घरी बोलावलं. ते घरी आले, मशीन आणि कनेक्शन जोडलं आणि म्हणाले, ‘‘ताई तुम्हाला जमणार नाही. तुमच्या मालकांना बोलवा.’’ मी त्यांना म्हटलं, की मशीन मी घेतली आहे. मी चालवणार, डाळ मी तयार करणार, अन् मग मालकांना कशाला बोलवायला पाहिजे! मी खूप विनंती के ल्यावर त्यांनी मला मशीन चालवायला शिकवलं. माझा व्यवसाय चांगला चालायला लागला. पण घरात दोघे पुरुष दारू पिणारे असल्यामुळे कडधान्याची डाळ करायला ज्या बायका यायच्या त्या भीत-भीत यायच्या. काही जणी येतच नव्हत्या. मग मी नवऱ्याला समजावलं, की तुम्ही दारू प्यायलात तर या स्त्रिया आपल्याकडे येणार नाहीत आणि डाळीचं काम मिळणार नाही आणि पैसेही मिळणार नाहीत. त्याचा मात्र चांगला फायदा झाला. त्यांची दारू सुटली…’’  पार्वतीबाईंचा अनुभव ऐकू न  फार समाधान मिळालं. त्यांनी स्वत:च्या कुटुंबाला दारिद्रयातून बाहेर काढलंच आणि आजूबाजूच्या स्त्रियांसाठी आदर्श उदाहरण ठरल्या.

मी तिथे जेवढा वेळ बसले होते, तेवढ्यात तिथे अशा तीन स्त्रिया आल्या होत्या, ज्यातल्या एकीला पापडांचं मशीन घ्यायचं होतं, एकीला शेवया-नूडल्स तयार करण्याचं मशीन घ्यायचं होतं आणि एकीला मसाला तयार करण्यासाठी मशीन हवं होतं. या तिघी पार्वतीताईंकडे सल्ला घ्यायला आल्या होत्या. खरंतर पार्वतीताईंचं शिक्षण आठवीसुद्धा नाही, पण मशीनच्या बाबतीत सगळ्या स्त्रिया त्यांनाच विचारत होत्या. ते चित्र बघून मी भारावून गेले. पार्वतीताई ‘माणदेशी महिला बँके ’साठीही ‘मेंटर’ ठरल्या.

 मला कोणी प्रश्न विचारला, की गेल्या दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत स्त्रियांच्या स्थानात काय फरक पडला, तर मला उत्तर देताना फार आशा वाटते, की पार्वतीताईंसारख्या लाखो स्त्रिया जर आज असत्या, तर भारताच्या अर्थव्यवस्थेत खूप वेगळा फरक दिसला असता. तसं प्रत्यक्षात झालेलं नाही. तरीही आशा वाटते, की सगळ्या बँकांनी, शासनाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये याचा विचार करायला हवा, की ज्या स्त्रिया छोटे छोटे उद्योग करतात, त्यांना नवीन मशिनरी मिळाली, (ही मशिन्स चालवायलाही सोपी असतात) तर त्यांचे उद्योग मोठे होतील. या दृष्टीनं मदत व्हायला हवी यामुळे त्यांच्या घरामध्ये कमाई वाढेलच, शिवाय या स्त्रियांची जी ओळख तयार होईल ती अगदी वेगळी असेल. हे असं चित्र आपल्या देशात खूप कमी बघायला मिळतं. आपल्या भोवताली जे देश आहेत- उदा. फिलिपिन्स, व्हिएतनाम, चीनही, तिथे अशा मशिन्सच्या माध्यमातून कितीतरी स्त्रिया उद्योग सुरू करतात. खास करून व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या दोन देशांमध्ये अशा स्त्रिया अधिक दिसतात. आता भारतातही आपण हे करू शकतो हे स्त्रियांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

२०१८ मध्ये ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या  वार्षिक सभेची मी ‘को-चेअर’ होते.  त्या वर्षीही ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’नं स्त्रियांचा अहवाल- ‘जेंडर रिपोर्ट’ तयार के ला. त्याच्या ‘स्टडी रिपोर्ट’मध्ये असं सांगितलं गेलं, की स्त्री-पुरुष असमानता संपवायची असेल तर, म्हणजे नोकरी, उद्योजकता, शिक्षण अशा सगळ्याच क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी अजून १३५ वर्षं लागतील. हा जागतिक अहवाल होता. ‘ब्लूमबर्ग’ संस्थेच्या अहवालानुसार स्त्री-पुरुष असमानता संपवण्यासाठी २१० वर्षं लागतील.  म्हणजे आपल्या प्रगतीसाठी एवढी वर्षं आपण वाट बघण्यासाठी तयार आहोत का?  माझं पहिलं उत्तर नाही असं असेल! स्त्री-पुरुष असमानता तेव्हा संपेल, जेव्हा तळागाळातल्या स्त्रिया केंद्रस्थानी येतील आणि पुढे जातील. त्या कशा पुढे येतील याचं उदाहरण मी सुरुवातीला दिलंच.

आता आणखी एक उदाहरण देते. पुण्यात व्यवसाय करत असलेल्या सविता पावणेकर   टी-शर्ट तयार करतात, युनिफॉर्मही तयार करतात. करोनामध्ये मार्च २०२० मध्ये टाळेबंदी होऊन सगळं बंद झालं. शाळाही बंद झाल्या, म्हणून त्यांना शाळेकडून निरोप आला की दिलेली ऑर्डर रद्द करा. सविता सांगतात,‘‘माझी परिस्थिती अशी होती की टेबलावर खूप कापड होतं, पण जेवण नव्हतं. खायचं काय हा प्रश्न होता.’’ त्यांनी दुसऱ्या दिवशीच- म्हणजे २९ मार्चला हजारो मास्क (मुखपट्टया) शिवायला घेतले. टाळेबंदीतही त्या रस्त्यावर मास्क विकायला लागल्या. प्रथम मास्क खरेदी करणारे पोलीस होते. त्या वेळी मास्क एवढे उपलब्ध नव्हते आणि लोकांना ते हवेच होते. पोलीस आणि टाळेबंदीत काम करणारे अनेक कर्मचारी यांना ‘एन नाइंटी फाइव्ह’ मास्क नव्हते.  सविताताईंनी कॉटनचे तीन पदरी मास्क शिवून विकले. त्यांचा व्यवसाय उभारला गेला. मग ‘माणदेशी महिला बँक’, ‘सिप्ला’ आणि ‘एचबीसी’ या संस्थांची मदत घेऊन एक टेक्स्टाइल युनिट बनवलं. तीन पदरी व नाकातोंडावर ‘फिट’ बसणाऱ्या मास्कचं डिझाइन करून  मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला. सविता यांनी ‘माणदेशी बँके’कडून मोठं मशीन घेण्यासाठी कर्ज घेतलं आणि मशीन विकत घेतलं. कापड कापण्याचं मशीन आणि मास्कच्या कानावर लावायच्या पट्टयांसाठीचं मशीन घेतलं. स्त्रियांना ‘डिजिटल’ कामांसाठी प्रशिक्षित के लं. त्या मास्कचं कापड घेऊन जाऊ शकतात आणि मास्क शिवू शकतात, असं ठरलं. सवितांच्या हाताखाली जेवढ्या स्त्रिया होत्या त्यांची त्यांनी शिफारस केली आणि गरज होती त्यांना दुचाकीसाठी कर्ज दिलं गेलं. कारण टाळेबंदीत कापड घेऊन जायला त्या कशा येणार हा प्रश्न होताच. स्त्रिया तीनशे ते पाचशे मास्क शिवून सविताला दुचाकीवरून आणून देत गेल्या. आज या स्त्रियांनी मिळून २५ लाखांच्या वर मास्क विकले आहेत.

गेल्या दशकात एक मोठा बदल हा घडला की स्त्रियांकडे उद्योजक म्हणून बघितलं गेलं,  त्यांना त्यांची अशी एक ओळख मिळाली. नोकरीच्या पलीकडे जाऊन स्वत:चा असा छोटा मोठा उद्योग सुरू करण्याकडे स्त्रियांचा कल वाढू लागला आहे. या उद्योजिका वाढव्यात यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजनाही आहेत.  उदाहरणार्थ, बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना कर्ज मिळणे. तसेच देशपातळीवर ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ आहे. त्यामार्फत स्त्रियांना प्रशिक्षण देऊन त्यांना भागभांडवल उपलब्ध करून देणं. आपल्या देशात प्रामुख्यानं महाराष्ट्र, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू व  मध्य प्रदेश  या राज्यात बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू के ले आहेत. त्यात त्या यशस्वीही होत आहेत.  ग्रामीण भागात दुधाचा व्यवसाय कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यात स्त्रियांचा खूप  मोठा वाटा आहे.  दूधविक्री- बरोबरच दुधावर प्रक्रिया करून  बासुंदी, तूप, पनीर बनवणं यामध्येही स्त्रियांचा पुढाकार असतो.  टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्येही आता स्त्रियांचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. करोना काळामध्ये स्त्रिया फक्त मास्क तयार करण्याचं काम करताना दिसल्या, मात्र आता त्या त्याहीपुढे जात आहेत. त्यामुळे  टेक्स्टाईल्स आणि ब्युटी या दोन क्षेत्रात स्त्रियांचा वावर वाढत चालला आहे, असं म्हणायला हरकत नाही. फॅशन डिझाइनिंगमध्ये तर भारतीय स्त्रियांनी चांगलीच मजल मारली आहे.  त्याचबरोबर केटरिंगचा बिझनेसही वाढत चालला आहे. केटरिंगमधला एक भाग म्हणजे डबे बनवणं. काही स्त्रिया तर कॉलेजचं कॅन्टीनही चालवतात.  त्याचबरोबर केक इंडस्ट्रीमध्येही स्त्रिया मोठ्या संख्येनं दिसत आहेत. काही स्त्रिया तर हजारो इडल्या बनवून सकाळीच  रेस्टॉरंटवाल्यांना पोहोचवतात, तर काही जणी दुपारच्या चपात्या करून देण्याचं काम करतात. आता तर वेगवेगळ्या भाजी फळांची पावडर करून देण्याचा उद्योगही विकसित होत आहे. त्यातही स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत.

 स्त्रियांच्या या उद्यमशीलतेला वाव देण्यासाठी मार्केटिंगमध्ये ज्या शासनाच्या योजना आहेत, त्यासाठी स्त्रियांच्या बचत गटांचा  समावेश केला पाहिजे. त्यांना विविध स्तरावर प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. ज्यांना स्टार्टअप  सुरू करायचं आहे त्यांना भांडवल देण्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवं. आता स्त्रिया मोठ्या प्रमाणावर  डिजिटल बँकिंग करायला लागल्या आहेत. तसंच ऑनलाइन व्यवहार करायला लागल्या आहेत. त्यांना जर सरकारी पातळीवर सोयीसुविधा, कर्ज मिळालं, तर त्यांचे लहान उद्योग उद्या नक्की मोठे होतील. ‘एमएसएमई’च्या (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय) पोर्टलवर स्त्रिया आपल्या उद्योगाची नोंदणी करू शकतात आणि त्याद्वारे उद्योगास आधार मिळवू शकतात. बऱ्याच परवान्यांची प्रक्रियाही सोपी झाली आहे. उद्योग केंद्रातील एकखिडकी योजनेतून हे परवाने मिळतात. परवाने ऑनलाईन प्राप्त होत असल्यामुळे त्यासाठी कु ठे जाण्याची गरज भासत नाही.

उद्यमशीलतेचे धडे खरंतर शाळा व महाविद्यालयीन पातळीवर देणं आवश्यक आहेत. विशेषत: मुलीसाठी हे उपकारक ठरू शके ल. हे सर्व बघता असं लक्षात येतं, की जर स्त्रियांनी उद्योग उभे केले, ‘स्त्रियांकडून स्त्रियांना काम’ या पद्धतीनं ते चालवले, ‘डिजिटल’ माध्यमं वापरली, मशिनरीचा वापर केला, त्यांना ‘मार्केट’ उपलब्ध करून दिलं गेलं आणि भांडवलही मिळालं, तर त्या वेळी भारताच्या अर्थव्यवस्थेला खरी गती मिळेल आणि स्त्री-पुरुष असमानताही संपवण्याकडे आपली वाटचाल होईल. हा फक्त स्त्रियांचाच नव्हे, तर देशाचाच विकास असेल!

chetana@manndeshi.org.in

Ref: Loksatta





Sunday, September 19, 2021

वाचू आनंदे… घडू या स्वानंदे…

 

वाचू आनंदे… घडू या स्वानंदे…

एक माणूस त्याच्या आयुष्यात किती आणि काय काय अनुभव घेऊ शकतो?

सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत याला बऱ्याच मर्यादा आहेत, हे खरंच. मात्र प्रतिभावंत, सर्जनशील माणसं आपल्या अनुभवांच्या कक्षा ओलांडून त्यापल्याड जात परकायाप्रवेशाने, कल्पनाशक्तीचे पंख लावून सूक्ष्म निरीक्षण, सम्यक आकलन, मनन आणि चिंतनातून अनुभवांचा बराच विस्तीर्ण प्रदेश पादाक्रांत करू शकतात… करतात. भटकंतीनेही माणसाचं विश्व प्रगल्भ होत जातं. या भ्रमंतीत भोवतालच्या माणसांचं जगणं अभ्यासत, त्यांची संस्कृती समजून घेत, त्याचं विश्लेषण करून आपलं अनुभवसंचित वाढवण्याचं कामही ही मंडळी करत असतात. जग भटकणारे रिचर्ड बर्टन हे याचं उत्तम उदाहरण. त्याचबरोबर प्रतिभावंतांच्या अनुभूतीच्या कक्षा वाढविण्याचं काम करतं ते त्यांचं विपुल आणि सर्वस्पर्शी वाचन! ज्यातून त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, आर्थिक तसंच अन्य मर्यादांपलीकडे जाऊन आजूबाजूचं जग, त्यात घडलेल्या घटना-घडामोडी, भवतालातलं ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान समजून घेणं त्यांना शक्य होतं. या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्यांच्या हातून निर्माण होणाऱ्या कलाकृती!

आज संगणक युगामुळे माहिती विस्फोटाच्या कड्यावर सध्या आपण विराजमान आहोत. त्यामुळे जगात अशी कोणतीच गोष्ट नाही, की जी समजून घेणं आपल्याला शक्य नाही. परिणामी एकीकडे आपण ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये राहत असल्याची शेखी मिरवीत असलो, तरीही ‘माणूस’ म्हणून आपण एकत्वाने, परस्पर सामंजस्याने जगतो आहोत का, हा कळीचा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच मिळतं. असं का झालं? विज्ञान-तंत्रज्ञानाने जग कितीही जवळ आलं असलं तरी त्यानेच माणसं दुरावतही चालली आहेत, हासुद्धा अनुभव सार्वत्रिक आहे. जगात सर्व प्रकारची विषमता, वर्ण-वंशभेद, धार्मिक विद्वेष, अस्मिता, राष्ट्रवाद, व्यक्तिवाद यांनी टोक गाठलेलं आहे. हे सारं स्वत:ला प्रगत, आधुनिक आणि प्रगल्भ म्हणविणाऱ्या मानवप्राण्याच्या बाबतीतलं आजचं कटु वास्तव आहे.

हे असं का घडलं?

याला कारण- माणसाच्या अफाट प्रज्ञेला करुणेची, सहृदयतेची किनार नसण्यानं हे होतंय.

यावर उपाय काय?

कोवळ्या, संस्कारक्षम वयात मुलांवर माणुसकीचे, सहृदयतेचे, विवेकाचे संस्कार करण्यात आपण आज कमी पडतो आहोत. ते संस्कार करण्याचं साधन आहे… पुस्तकं. जी मुलांचं भावविश्व तर विस्तारतातच; त्याचबरोबर माणसं, त्यांचं जगणं समजून घेण्यात त्यांना मदतही करतात. एखाद्या गोष्टीचे विविधांगी कंगोरे समजून घेण्यासाठी त्यांना ती मदत करतात. त्यातून त्यांच्या अनुभवांच्या कक्षा विस्तारत जातात. जसजसे वाचनानुभवाचे अगणित दरवाजे उघडत जातात तसतशी मुलांची ज्ञानाची क्षितिजंही अथांग होत जातात. या वाटचालीत त्यांचं मन आणि बुद्धी संवेदनशील बनत जाते. नवनवी अनुभूती त्यांना वाचनातून येत जाते. अवतीभोवतीचं जग समजून घेताना त्यांची आकलनशक्तीही प्रसरण पावत जाते. नव्या अनुभवांना सामोरं जाण्याची त्यांची क्षमता विकसित होते. जगण्याचे अनेकानेक कोन समजून घेताना सहृदयता आणि विवेकाने त्याबद्दलच्या धारणा विकसित होत जातात.

म्हणूनच या उन्हाळी सुट्टीत कुमार वयातील मुलांनी नेमकं काय वाचायला हवं, याबद्दल विविध क्षेत्रांतील

१०० मान्यवरांकडून ‘लोकसत्ता’ने ‘पुस्तक शिफारस’ मागविली होती. प्रत्येकाने पाच पुस्तकं सुचवावीत असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांचं स्वत:चं कुमार वयातलं वाचन, त्यावेळची त्यांची आवडनिवड, पुढे वाढत्या

वयाने विस्तारलेल्या जाणिवांच्या कक्षांमुळे वाचनाबद्दल त्यांना आलेली एक सकल जाण आणि विवेचक दृष्टी, त्यातून वर्तमान पिढीनं काय वाचलं तर त्यांची चांगली घडण होऊ शकेल असं त्यांना वाटतं… या विचारांतून त्यांनी केलेली पुस्तकांची ही शिफारस आहे… अर्थात प्रातिनिधिक…!

१. अरुणा ढेरे

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

पाडस- मार्जोरी किंनन रोलिंग, अनुवाद- राम पटवर्धन

राजा शिवछत्रपती- ब. मो. पुरंदरे

विशाखा- कुसुमाग्रज

रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर

 

२. सई परांजपे

बेडूकवाडी- ना. ग. गोरे

श्यामची आई-साने गुरुजी

वाचू आनंदे- माधुरी पुरंदरे

विंदा करंदीकरांच्या बालकवितांचा खजिना

 

३.  प्रा. सदानंद मोरे

इसापनीती

निबंधमालेतील विनोद आणि महद आख्यायिका

गोट्या- ना. धों. ताम्हनकर

अंधाराचे गाव- स्वाती राजे

प्रतीक- मृणालिनी वनारसे

 

४. मेधा पाटकर

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

प्रबोधनातील पाऊलखुणा- निर्मलकुमार फडकुले

प्रकाशवाटा- डॉ. प्रकाश आमटे

हेही दिवस जातील- डॉ. आनंद नाडकर्णी

वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज- डॉ. सुधा मूर्ती

 

५. अश्विनी भिडे-देशपांडे

प्रकाशवाटा- प्रकाश आमटे

वनवास- प्रकाश नारायण संत

धूळपाटी, चौघीजणी- शांता शेळके

सत्तांतर-  व्यंकटेश माडगूळकर

श्रीमान योगी- रणजित देसाई

 

६. अतुल पेठे 

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

ओसाडवाडीचे देव – चिं. वि. जोशी

झाडं लावणारा माणूस- जाँ जिओनी,

अनुवाद : माधुरी पुरंदरे

झुंजारकथा-  बाबुराव अर्नाळकर

आमचं बालपण- गौरी रामनारायण,

अनुवाद : उल्का राऊत

 

७. अशोक नायगावकर

वनवास/ शारदा संगीत- प्रकाश नारायण संत

डोह- श्रीनिवास विनायक कुलकर्णी

आठवणींचे पक्षी- प्र. ई. सोनकांबळे

रातवा- चंद्रकुमार नलगे

व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे

 

८. नीरजा

मरण स्वस्त होत आहे- बाबुराव बागूल

कोसला- भालचंद्र नेमाडे

शांतता! कोर्ट चालू आहे-  विजय तेंडुलकर

शोध- सानिया

चक्र- विद्याधर पुंडलिक

 

९. दासू वैद्य

नापास मुलांची गोष्ट- संपादक-  अरुण शेवते

विंदा करंदीकरांच्या बालकविता

निवडक बालकुमार साधना-  संपादक-  विनोद शिरसाठ

खारीच्या वाटा- ल. म. कडू

सृष्टीत… गोष्टीत… – अनिल अवचट

 

१०.  सचिन कुंडलकर

चकवा चांदण- मारुती चितमपल्ली

शारदा संगीत- प्रकाश नारायण संत

धग- उद्धव शेळके

पिकासो- माधुरी पुरंदरे

ऋतुचक्र- दुर्गा भागवत

 

११. प्राजक्त देशमुख

डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक-  अनुवाद- मंगला निगुडकर

फेलुदा- सत्यजीत राय, अनुवाद- अशोक जैन

मालगुडी डेज- आर. के. नारायण,

अनुवाद- मधुकर धर्मापुरीकर

मोर- अनिल अवचट

वनवास- प्रकाश नारायण संत

 

१२. प्रवीण दशरथ बांदेकर

तीन मुले- साने गुरुजी

वाचू आनंदे (कुमार गट- भाग १ व २), संपादन- माधुरी पुरंदरे, साहाय्य- नंदिता वागळे

सृष्टीत… गोष्टीत… – अनिल अवचट

वॉल्ट डिस्ने : स्वप्नांचा किमयागार- ज्ञानदा आसोलकर

ऋतुफेरा- सलीम मुल्ला

 

१३. दिलीप प्रभावळकर

वाचू आनंदे- माधुरी पुरंदरे

सृष्टीत… गोष्टीत… – अनिल अवचट

ओसाडवाडीचे देव- चिं. वि. जोशी

गावाकडच्या गोष्टी- व्यंकटेश माडगूळकर

धडपडणारी मुले- साने गुरुजी

 

१४. डॉ. सदानंद देशमुख

बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर

श्यामची आई- साने गुरुजी

आनंदमेळा- बाबा भांड

नदी रुसली, नदी हसली- सुरेश सावंत

वाचू आनंदे… ‘मिळवू’ परमानंदे- नरेंद्र लांजेवार

 

१५. प्रतिमा कुलकर्णी

प्रियदर्शिनीस पत्रे (लेटर्स टु माय डॉटर)

– जवाहरलाल नेहरू

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

किमयागार- अच्युत गोडबोले

स्टिफन हॉकिंग यांची लहानांसाठीची पुस्तके

महाभारत

 

१६. आशा बगे

चिमणरावाचे चऱ्हाट- चिं. वि. जोशी

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर

चौघीजणी-  लुईस मे अल्कॉट,

अनुवाद – शांता शेळके

दुर्गभ्रमण गाथा-  गो. नी. दांडेकर

 

१७. वीणा गवाणकर

मला उत्तर हवंय- मोहनआपटे

रंजक विज्ञान प्रयोग- भालबा केळकर

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

अग्निपंख- ए. पी.जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

जंगल खजिन्याचा शोध- सलीम सरदार मुल्ला

 

१८. प्रज्ञा दया पवार

विचार तर कराल- नरेंद्र दाभोलकर

कुहू- कविता महाजन

निशाणी डावा अंगठा- रमेश इंगळे- उत्रादकर

रावीपार- गुलजार, अनुवाद- विजय पाडळकर,

मोहन वेल्हाळ

आपलं आयकार्ड- राही श्रुती गणेश

आणि श्रीरंजन आवटे

 

१९. मल्लिका अमर शेख

देनिसच्या गोष्टी- विक्तर द्रागूनस्की,

अनुवाद- अनघा भट

वनवास, झुंबर, पंखा, शारदा संगीत- प्रकाश नारायण संत

माँटुकले दिवस- संदेश कुलकर्णी

बंडखोर बंडू- शं. ह. कुलकर्णी

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

 

२०. डॉ. आनंद नाडकर्णी

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

आईची देणगी-  गो. नी. दांडेकर

रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर

स्वत:विषयी/ मोर- अनिल अवचट

 

२१. उर्मिला मातोंडकर

श्यामची आई- साने गुरुजी

इसापनीती

लोकमान्य टिळक चरित्र- न. चिं. केळकर

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, माधुरी शानभाग

चला जाऊ अवकाश-सफरीला- डॉ. जयंत नारळीकर

 

२२. मधुकर धर्मापुरीकर

तुमचे आमचे हिरो- अनकॉमन मॅन… आर. के. लक्ष्मण

मालगुडी डेज- आर. के. नारायण

माँटुकले दिवस- संदेश कुलकर्णी

तोत्तोचान- तेस्तुको कुरोयानागी-

अनुवाद- चेतना सरदेशमुख- गोसावी

देनिसच्या गोष्टी- विक्तर द्रागूनस्की,

अनुवाद- अनघा भट

२३. मोनिका गजेंद्रगडकर

पोरवय- रवींद्रनाथ ठाकूर,

अनुवाद- पु. ल. देशपांडे

वनवास- प्रकाश नारायण संत

वाचू आनंदे- संपादन : माधुरी पुरंदरे,

साहाय्य : नंदिता वागळे

मृत्युंजय-  शिवाजी सावंत

कोसला- भालचंद्र नेमाडे

 

२४. गिरीश कुलकर्णी

झाडं लावणारा माणूस- जॉं जिओनो,

अनुवाद- माधुरी पुरंदरे

एका स्वप्नाचा प्रवास : लगान- सत्यजीत भटकळ-  अनुवाद- अशोक जैन

वामन परत न आला- जयंत नारळीकर

माणसे- अरभाट आणि चिल्लर- जी. ए. कुलकर्णी

व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे

 

२५. चिन्मय मांडलेकर

बखर बिम्मची- जी. ए. कुलकर्णी

गजकथा- निनाद बेडेकर

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

मिरासदारी- द. मा. मिरासदार

बोक्या सातबंडे- दिलीप प्रभावळकर

 

२६. क्षितीज पटवर्धन

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

तोत्तोचान- तेस्तुको कुरोयानागी, अनुवाद- चेतना सरदेशमुख-गोसावी

यक्षांची देणगी- जयंत नारळीकर

दर्या- विक्रम पटवर्धन

सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे

 

२७. अमृता सुभाष

वनवास- प्रकाश नारायण संत

सोन्याचा पिंपळ- श्रीनिवास विनायक कुलकर्णी

बखर बिम्मची- जी. ए. कुलकर्णी

इंधन- हमीद दलवाई

तुकारामाचे अभंग

 

२८. जितेंद्र जोशी

वाचू आनंदे- संपादन : माधुरी पुरंदरे,

साहाय्य : नंदिता वागळे

नाझी भस्मासुराचा उदयास्त- वि. ग. कानिटकर

रानातली गोष्ट, मनातील गोष्ट- नंदिनी देशमुख

शाबास शेरलॉक होम्स- भा. रा. भागवत

वनवास- प्रकाश नारायण संत

 

२९. प्रणव सखदेव

त्या एका दिवशी- माधुरी पुरंदरे

करुणाष्टक-  व्यंकटेश माडगूळकर

कहाणी मानव प्राण्याची- नंदा खरे

कुसुमगुंजा- जी. ए. कुलकर्णी

बलुतं- दया पवार

 

३०. अमोल उदगीरकर

नाझी भस्मासुराचा उदयास्त- वि. ग. कानिटकर

बलुतं- दया पवार

बदलता भारत-  भानू काळे

फास्टर फेणे-  भा. रा. भागवत

यक्षांची देणगी-  जयंत नारळीकर

 

३१. हेमंत ढोमे

वनवास-  प्रकाश नारायण संत

शाळा-  मिलिंद बोकील

फकिरा-  अण्णाभाऊ साठे

शिवाजी कोण होता?-  कॉ. गोविंद पानसरे

कोसला-  भालचंद्र नेमाडे

 

३२. निपुण धर्माधिकारी

बखर बिम्मची-  जी. ए. कुलकर्णी

वनवास- प्रकाश नारायण संत

शारदा संगीत-  प्रकाश नारायण संत

पंखा- प्रकाश नारायण संत

श्रीमान योगी-  रणजीत देसाई

 

३३. रोहित देशमुख (तरुण तेजांकित विजेते)

रारंगढांग-  प्रभाकर पेंढारकर

एक होता काव्र्हर-  वीणा गवाणकर

तोत्तोचान- तेस्तुको कुरोयानागी, अनुवाद- चेतना सरदेशमुख-गोसावी

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

बोक्या सातबंडे- दिलीप प्रभावळकर

 

३४. दिलीप वेंगसरकर (माजी क्रिकेटपटू)

ती फुलराणी- पु. ल. देशपांडे

बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे

क्रिकेट कसं खेळावे- डॉन ब्रॅडमन,

अनुवाद- अतुल कहाते

संवाद स्वत:शी – नेल्सन मंडेला- अनुवाद- गौरी साळवेकर

वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष- नेल्सन मंडेला, अनुवाद- अतुल कहाते

 

३५. लालचंद राजपूत (माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक)

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम- अनुवाद- माधुरी शानभाग

सचिन तेंडुलकर- प्लेइंग इट माय वे- अनुवाद- दीपक कुलकर्णी

२८१ अ‍ॅण्ड बियाँड (अनुवाद)- व्ही. व्ही.एस. लक्ष्मणचे आत्मचरित्र

बोक्या सातबंडे- दिलीप प्रभावळकर

सनी डेज- सुनील गावस्कर

 

३६. प्रवीण ठिपसे (माजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू)

सुदाम्याचे पोहे- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

श्यामची आई- साने गुरुजी

कऱ्हेचे पाणी-  आचार्य अत्रे

विशाखा- कुसुमाग्रज

शिवाजी कोण होता?-  गोविंद पानसरे

 

३७. प्रवीण आमरे (माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक)

मृत्युंजय-  शिवाजी सावंत

असामी असामी- पु. ल. देशपांडे

बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे

ययाती- वि. स. खांडेकर

स्वामी-  रणजीत देसाई

 

३८. अरुंधती पानतावणे (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू)

श्रीमान योगी-  रणजीत देसाई

जय- देवदत्त पटनायक

तीन हजार टाके- सुधा मूर्ती- लीना सोहोनी

पुण्यभूमी भारत- सुधा मूर्ती- लीना सोहोनी

आयुष्याचे धडे गिरवताना- सुधा मूर्ती- लीना सोहोनी

 

३९. अनिकेत सुळे (तरुण तेजांकित विजेता)

शारदा संगीत- प्रकाश नारायण संत

सलाम- मंगेश पाडगावकर

बाराला दहा कमी- पद्माजा फाटक, माधव नेरूरकर

व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे

नाझी भस्मासुराचा उदयास्त- वि. ग. कानिटकर

 

४०. नीलेश साठे  (निवृत्त कार्यकारी संचालक, एलआयसी)

पराक्रमाची हिमशिखरे- प्रा. प्रदीप ढवळ

महान स्त्रिया- अनुराधा पोतदार

राजाशिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे

गोष्टी माणसांच्या- सुधा मूर्ती- लीना सोहोनी

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

 

४१. संजीव नवांगुळ-  मुख्य कार्यकारी अधिकारी, भारत सीरम

मुसाफिर- अच्युत गोडबोले

शाळा- मिलिंद बोकिल

व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे

मृत्युंजय- शिवाजी सावंत

वरदान रागाचे- अरुण गांधी, अनुवादित- सोनाली नवांगुळ

 

४२. मंदार आगाशे, संस्थापक- सर्वत्र टेक्नॉलॉजीज

स्टीव्ह जॉब्स- वॉल्टर आयझॅक्सन, अनुवाद- विलास साळुंखे

बिल गेट्स : यशाचे आणि श्रीमंतीचे धडे- आशा कवठेकर

एलॉन मस्क- रँडी कर्क, अनुवाद- सुनिती काणे

श्रीमान योगी- रणजीत देसाई

रंग माझा वेगळा/  झंझावात (कवितासंग्रह)-  सुरेश भट

 

४३. डॉ. मिलिंद वाटवे

शिवबाचे शिलेदार-  गो. नी. दांडेकर

मंझधार- वि. स. खांडेकर

माझे चिंतन- पु. ग. सहस्राबुद्धे

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

 

४४. उमेश कुलकर्णी

वामन परत न आला- जयंत नारळीकर

छोटा राजकुमार-आन्तुआन द संतेक्झ्युपेरी, अनुवाद- लतिका मांडे

कथासरित्सागर-सोमदेव, अनुवाद- ह. अ. भावे

फेलूदा- सत्यजित रे

वाचू आनंदे- माधुरी पुरंदरे

 

४५. सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालय.

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

श्रीमान योगी- रणजीत देसाई

बलुतं- दया पवार

शाळा- मिलिंद बोकील

पंखा- प्रकाश नारायण संत

 

४६. विवेक फणसळकर, महासंचालक, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळ

राजा शिवछत्रपती- ब. मो. पुरंदरे

बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर

चिमणरावांचे चऱ्हाट – चिं. वि. जोशी

सत्याचे प्रयोग- महात्मा गांधी

काळे पाणी- वि. दा. सावरकर

 

४७. विश्वास नांगरे-पाटील,  सहपोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था

श्यामची आई- साने गुरुजी

छावा- शिवाजी सावंत

श्रीमान योगी- रणजित देसाई

पानिपत- विश्वास पाटील

मृत्युंजय- शिवाजी सावंत

 

४८. गुरू  ठाकूर

राजाशिवछत्रपति- ब. मो. पुरंदरे

पानिपत- विश्वास पाटील

व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे

हसरे दु:ख- भा. द. खेर

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

 

४९. मृणाल कुलकर्णी

पाडस-  राम पटवर्धन

चौघीजणी- लुईस मे अल्कॉट, अनुवाद- शांता शेळके

वनवास, पंखा- प्रकाश नारायण संत

रुमाली रहस्य-  गो. नी. दांडेकर

भुताळी जहाज- भा. रा. भागवत

 

५०. मंगला गोडबोले

फास्टर फेणे-  भा. रा. भागवत.

बोक्या  सातबंडे- दिलीप  प्रभावळकर

वाचू आनंदे-  माधुरी  पुरंदरे

एक होता  काव्र्हर- वीणा गवाणकर

खारीच्या वाटा- ल. म. कडू

 

५१. अनंत सामंत

रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर

झिपऱ्या- अरुण साधू

शेकरा- रणजीत देसाई

माचीवरला बुधा- गो. नी. दांडेकर

खंडाळ्याच्या घाटासाठी- शुभदा गोगटे

 

५२. अविनाश धर्माधिकारी

राजाशिवछत्रपति-  ब. मो. पुरंदरे

श्यामची आई-  साने गुरुजी

माझी जन्मठेप- वि.  दा. सावरकर

आमचा बाप आणि आम्ही-  नरेंद्र जाधव

कृष्णाकाठ-  यशवंतराव चव्हाण

 

५३. डॉ. गणेश देवी

श्यामची आई- साने गुरुजी

माणदेशी माणसं- व्यंकटेश माडगूळकर

हकलबेरी फिनची साहसं- मार्कट्वेन, अनुवाद-  अवधूत डोंगरे

पोस्ट ऑफिस- रवींद्रनाथ टागोर

मॅनइटर ऑफ कुमाऊँ- जीम कॉर्बेट, अनुवाद- विश्वास भावे

 

५४. किरण येले

पंखा- प्रकाश नारायण संत

बोलगाणी-  मंगेश पाडगांवकर

तीन मुलांचे चार दिवस-  (सत्यघटना रोजनिशी) आदर्श, विकास, कृष्णा

न पेटलेले दिवे- राजा शिरगुप्पे

हाती ज्यांच्या शून्य होते- (चरित्र), संपादक- अरुण शेवते

 

५५.भूषण गगराणी, नगरविकास प्रधान सचिव

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

भारताचा शोध-  पं. जवाहरलाल नेहरू

श्यामची आई-  साने गुरुजी

लॉर्ड ऑफ फ्लाईज-  विल्यम गोल्डिंग, अनुवाद- जी. ए. कुलकर्णी

फास्टर फेणे- भा.  रा. भागवत

 

५६. अमृता हाजरा- तरुण तेजांकित विजेती

माधुरी पुरंदरे यांची सर्व पुस्तके

भुताळी जहाज, ब्रह्मदेशातील खजिना- भा. रा. भागवत

व्हायरस, वामन परत न आला- जयंत नारळीकर

गोट्या- ना. धों ताम्हनकर

चिमणराव आणि गुंड्याभाऊ-  चिं. वि. जोशी

५७. कृपाली बिडये- तरुण तेजांकित विजेती

श्यामची आई- साने गुरुजी

मी देशाला काय देऊ शकतो- लाइफ लेसन फ्रॉम माय गुरू-  ए. पी. जी. अब्दुल कलाम- सृजन पाल सिंह

द डायरी ऑफ ए यंग गर्ल- अ‍ॅन फ्रँक, अनुवाद- मंजूषा सु. मुळे

मी मलाला- क्रिस्टीना लॅम्ब, अनुवाद- सुप्रिया वकील

साद घालती हिमशिखरे- जी.  के. प्रधान

 

५८. वैभव मांगले

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

चांदोबा

सिंदबादच्या सफरी

पंचतंत्र

बोक्या सातबंडे-  दिलीप प्रभावळकर

 

५९. अजित भुरे

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

वाचू आनंदे- माधुरी पुरंदरे

राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे

अपूर्वाई / पूर्वरंग-  पु. ल. देशपांडे

पंखा- प्रकाश नारायण संत

 

६०. प्राजक्ता लवंगारे

श्यामची आई- साने गुरुजी

स्वामी- रणजित देसाई

आजीच्या पोतडीतल्या गोष्टी- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी

गोट्या- ना. धों. ताम्हनकर

फास्टर फेणे- भा. रा. भागवत,

 

६०. मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य

व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ-  पु. ल. देशपांडे

श्रीमानयोगी- रणजित देसाई

ययाति- वि. स. खांडेकर

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

किशोर, कुमार, चांदोबा ही मासिके

 

६२. डॉ.  महेश बेडेकर

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

माती, पंख आणि आकाश- ज्ञानेश्वर मुळे

कर हर मैदान फतेह-  विश्वास नांगरे पाटील

डॉ.  रघुनाथ माशेलकर- अ.  पां. देशपांडे

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा- शमी सूद, अनुवाद- भगवान दातार

 

६३.  प्रसाद प्रधान (व्हीपी, हिंदुस्तान युनिलिव्हर)

श्यामची आई- साने गुरुजी

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

तोत्तोचान- तेत्सुको कुरोयानागी, अनुवाद- चेतना सरदेशमुख- गोसावी

वाचू आनंदे- माधुरी पुरंदरे

 

६४ . डॉ. आशीष थत्ते, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट ऑफ इंडिया

चिंता सोडा सुखाने जगा- डेल कार्नेजी (अनुवादित)

द पॉवर ऑफ हॅबिट- चाल्र्स डुहीग (अनुवादित)

अग्निपंख- अब्दुल कलाम, अनुवाद-  माधुरी शानभाग

दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही- जेफ केलर, (अनुवादित)

मुसाफिर- अच्युत गोडबोले

 

६५. अमित मांजरेकर, विपणन प्रमुख, आदित्य बिर्ला सन-लाइफ म्युच्युअल फंड

तीन हजार टाके- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी

कथा चाणक्य- राधाकृष्ण पिल्लई (अनुवादित)

पॅपिलॉन- हेन्री शॅरीअर, अनुवाद- रवींद्र गुर्जर

द पॉवर ऑफ हॅबिट- चाल्र्स डुहीग (अनुवादित)

इमोशलन इन्टिलिजन्स-  डॅनिअल गोलमन (अनुवादित)

 

६६. भालचंद्र जोशी, मुख्य परिचालन अधिकारी, व्हाईट ओक कॅपिटल

स्वामी विवेकानंदांच्या आनंदकथा- डॉ. सुरुची पांडे

ए. पी. जे. अब्दुल कलाम- रेनू सरन

किस्से शास्त्रज्ञांचे- प्रा. सुनील विभूते

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

फुरसुंगीचा फास्टर फेणे- भा. रा. भागवत

 

६७. आशुतोष जावडेकर

प्रेषित, अंतराळातील भस्मासूर- जयंत नारळीकर

वंगचित्रे- पु. ल. देशपांडे

फास्टर फेणे- भा. रा. भागवत, शेरलॉक होम्स (अनुवादित)

बोलगाणी – मंगेश पाडगावकर

चौघीजणी-  लुईस मे अल्कॉट, अनुवाद- शांता शेळके

 

६८. नवनाथ गोरे

श्यामची आई- सानेगुरुजी

गोट्या- ना. धों. ताम्हनकर

शितू- गो. नी. दांडेकर

आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, अनुवाद- लीना सोहोनी

झिम पोरी झिम- बालाजी मदन इंगळे

 

६९. डॉ. राजेंद्र बर्वे

आकाशाशी जडले नाते- जयंत नारळीकर

चिमणरावांचे चऱ्हाट- चिं. वि. जोशी

फास्टर फेणे-  भा. रा. भागवत

राजा शिवछत्रपती- ब. मो. पुरंदरे

पुष्पादंत- महादेवशास्त्री जोशी

 

७०. हृषिकेश गुप्ते

शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा- आर्थर कॉनन डायल, अनुवाद- प्रा. भालबा केळकर

बाराला दहा कमी- पद्माजा फाटक/ माधव नेरुरकर

लिहावे नेटके- माधुरी पुरंदरे

निवडक बाबुराव अर्नाळकर- संपादक : सतीश भावसार

चकवाचांदण- मारुती चित्तमपल्ली

 

७०. अनंत भावे

चक्रवर्ती नेपोलियन- वि. ल. भावे

विंदा करंदीकरांच्या बालकवितांचा खजिना

कळलाव्या कांद्याची कहाणी- रत्नाकर मतकरी

भानू शिरधनकरांच्या शिकारकथा

 

७२. शेखर ढवळीकर

शिवचरित्र- बाबासाहेब पुरंदरे

बोक्या सातबंडे- दिलीप प्रभावळकर

शेरलॉक होम्सच्या कथा

जिम कॉर्बेटच्या शिकारकथा- विशेषत: रुद्रप्रयागचा बिबट्या

नारायण धारप यांच्या गूढ / भयकथा…

 

७३. शरणकुमार लिंबाळे

तिमिरातून तेजाकडे-  नरेंद्र दाभोलकर

माणसं- अनिल अवचट

उचल्या- लक्ष्मण गायकवाड

जेव्हा माणूस जागा होतो- गोदावरी परुळेकर

कोल्हाट्याचं पोर- किशोर काळे

 

७४. प्रफुल्ल शिलेदार

यांनी घडविले सहस्राक-

संपादक- सुहास कुलकर्णी व मिलिंद चंपानेरकर

कहाणी मानवप्राण्याची- नंदा खरे

माझी काटेमुंढरीची शाळा- गो. ना. मुनघाटे

पाडस- मार्जोरी किनन रॉलिंग-

अनुवाद- राम पटवर्धन

कथासरित्सागर- भाषांतर- ह. अ. भावे

 

७५. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी- समीक्षक व कवी

दगड धोंडे – नंदा खरे

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

संवाद- अच्युत गोडबोले

तेरा अपूर्व किशोर कथा

रंगावली- सुधा लिमये.

 

७६. डॉ. रवींद्र शोभणे

श्यामची आई- साने गुरुजी

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

मृत्युंजय- शिवाजी सावंत

माझंही एक स्वप्न होतं- वर्गीस कुरियन, अनुवाद- सुजाता देशमुख

महामानव अब्राहम लिंकन- रमेश पतंगे

 

७७. विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ

इडली ऑर्किड आणि मी- विठ्ठल कामत

नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर

याराना- ग्यानदेव अग्निहोत्री

मनाची शक्ती कशी वापराल- मनोज अंबिके

असे घडवा तुमचे भविष्य-

ए. पी. जे. अब्दुल कलाम- अनुवाद – मनोज अंबिके

 

७८. प्रशांत वैद्य- आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

श्रीमान योगी- रणजित देसाई

हिंदुत्व- वि. दा. सावरकर

अग्निपंख- ए. पी.जे. अब्दुल कलाम, माधुरी शानभाग

माझे सत्याचे प्रयोग- महात्मा गांधी

एका योग्याची आत्मकथा- परमहंस योगानंद

 

७९. डॉ. यशवंत मनोहर

भारताचे संविधान (उद्देशिका आणि एकावन्नाव्या अनुच्छेदापर्यंतचा भाग)

गुलामगिरी- जोतिराव फुले

भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष-  एस. जी. सरदेसाई

एका कोळियाने- पु. ल. देशपांडे (अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’चा अनुवाद)

ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम- स्टीफन हॉकिंग,

अनुवाद- डॉ. सुभाष के देसाई

 

८०. लोकनाथ यशवंत – कवी

नाट्यविज्ञान समाजीन- वृत्त आणि विचार- डॉ. हेमू अधिकारी

पहिला नंबरकारी- अमिता नायडू

मी अल्बर्ट एलिस- अंजली जोशी

७२ मैल- अशोक व्हटकर

इरवाड… स्वकथन- ना. तु. पोघे

 

८१. अशोक राजवाडे

शाळा- मिलिंद बोकील

वनवास- प्रकाश नारायण संत

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

चिरीमिरी- अरुण कोलटकर

 

८२. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, सोलापूर

सिंहासन- अरुण साधू

हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ

– भालचंद्र नेमाडे

एका मारवाड्याची गोष्ट- डॉ. गिरीश जाखोटिया

टाटायन- गिरीश कुबेर

शिकविले ज्यांनी- अनिल अवचट

 

८३. प्रशांत कुलकर्णी

राजा शिवछत्रपती-  ब. मो. पुरंदरे

हसरी गॅलरी- शि. द. फडणीस

बनगरवाडी- व्यंकटेश माडगुळकर

भटकबहाद्दर- (हकलबेरी फिन- मार्क ट्वेन)- अनुवाद- भा. रा. भागवत

वाचू आनंदे- माधुरी पुरंदरे

 

८४. कविता राऊत (आंतरराष्ट्रीय धावपटू)

मृत्युंजय- शिवाजी सावंत

पानिपत- विश्वास पाटील

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

कोसला- भालचंद्र नेमाडे

फकिरा- अण्णा भाऊ साठे

 

८५.  तेजस्विनी सावंत (आंतरराष्ट्रीय नेमबाज)

शिवचरित्र- पुरुषोत्तम खेडेकर

माझी जन्मठेप- वि. दा. सावरकर

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

छावा- शिवाजी सावंत

 

८६. भक्ती कुलकर्णी (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू)

भगवद्गीता

द सीक्रेट… रहस्य- रोंडा बायर्न (मराठी अनुवाद)

अनब्रेकेबल- मेरी कोम, अनुवाद- विदुला टोकेकर

महाभारत

५ ए. एम. क्लब- रॉबिन शर्मा (मराठी अनुवाद)

 

८७. रमेश पोवार (माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक)

आयुष्याचे धडे गिरवताना- सुधा मूर्ती-  अनुवाद- लीना सोहोनी

श्यामचीआई- साने गुरुजी

पंचतंत्र

अकबर- बिरबलाच्या गोष्टी

छावा- शिवाजी सावंत

 

८८. मधुरिका पाटकर (टेबल टेनिसपटू)

पॉवर ऑफ युवर सबकॉन्शिअस माइंड, जोसेफ मरफी- अनुवाद- पुष्पा ठक्कर

विनिंग हॅबिट्स- डॉ. भीष्मराज बाम

शेरलॉक होम्स- आर्थर कॅनन डॉयले, अनुवाद- दिलीप चावरे

४) हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ- भालचंद्र नेमाडे

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

 

८९. राही सरनोबत (आंतरराष्ट्रीय नेमबाज)

विचार तर कराल- नरेंद्र दाभोलकर

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे

अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग

चला जाऊ अवकाश सफरीला- जयंत नारळीकर

 

९०. अभिलाषा म्हात्रे (अर्जुन पुरस्कार विजेती कबड्डीपटू)

श्रीमान योगी- रणीजीत देसाई

छावा- शिवाजी सावंत

मृत्युंजय- शिवाजी सावंत

प्लेइंग इट माय वे- सचिन तेंडुलकर- मराठी अनुवाद

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

 

९१. पूनम राऊत (आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू)

प्लेइंग इट माय वे- सचिन तेंडुलकर, अनुवाद

पंचतंत्र

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके

श्यामची आई- साने गुरुजी

महाभारत

 

९२. श्रीराम ऊर्फ राजू भावसार (अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू)

इंदिरेस पत्रे : पं. जवाहरलाल नेहरू

मुंबई ते काश्मीर सायकल प्रवास : अरुण वेढीकर

सिल्व्हर स्टार : माधुरी पुरंदरे

युद्धकथा : अनंत भावे

कणखर पी. व्ही. सिंधू-  संजय डोंगरे

 

९३. अभिजीत कुंटे (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू)

शिवाजी द ग्रेट मराठा- रणजित देसाई

पावनखिंड : बाजीप्रभू देशपांडे- रणजित देसाई

हॅरी पॉटर- जे. के. रोलिंग

पंचतंत्र

प्लेइंग इट माय वे- सचिन तेंडुलकर (अनुवाद)

 

९४. अंजली भागवत (आंतरराष्ट्रीय नेमबाज / प्रशिक्षक)

आजीच्या पोतडीतल्या गोष्टी- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी

आयुष्याचे धागे- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी

शिवचरित्र

आजोबांच्या रंजक कथा

पंचम- बोधकथा

 

९५. सुमा शिरूर (आंतरराष्ट्रीय नेमबाज )

श्यामची आई- साने गुरुजी

शिवचरित्र – पुरुषोत्तम खेडेकर

आजोबांच्या आवडत्या गोष्टी

बोक्या सातबंडे- दिलीप प्रभावळकर

द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स- शेरलॉक होम्स, अनुवाद- प्रवीण जोशी

 

९६. रघुनंदन गोखले (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक )

वीरधवल- नाथमाधव

एक होता काव्र्हर- वीणा गवाणकर

टॉम सायरच्या साहसकथा- मार्क ट्ेवन

वन टू बकल माय शू- अ‍ॅगाथा ख्रिस्ती, अनुवाद- रेखा देशपांडे

फेलूदा- सत्यजित रे, अनुवाद- अशोक जैन

 

९७. धनंजय महाडिक (माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू)

सचिन तेंडुलकर- प्लेइंग इट माय वे- बोरिया मजुमदार

द लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ मेजर ध्यानचंद- रचना भोला

पी. टी. उषा- कुमकुम खन्ना

द रेस ऑफ माय लाइफ : मिल्खा सिंग- राकेश ओमप्रकाश मेहरा

महाभारत

 

९८. वीणा देव

फास्टर फेणे- भा. रा. भागवत

आईची देणगी- गो. नी. दांडेकर

पियूची वही-  संगीता बर्वे

वाचू आनंदे- संपादन : माधुरी पुरंदरे,

साहाय्य : नंदिता वागळे

कासवांचे बेट- डॉ. संदीप श्रोत्री

 

९९. संजय आर्वीकर, साहित्यिक

ऋतुचक्र- दुर्गा भागवत

पाडस- मार्जोरी किनन रॉलिंग्ज,

अनुवाद- राम पटवर्धन

आमचं बालपण- गौरी रामनारायण-

अनुवाद- उल्का राऊत

माझी जन्मठेप- वि. दा. सावरकर

प्रेषित- जयंत नारळीकर

 

१००. डॉ. प्रमोद  मुनघाटे

साने गुरुजींच्या गोड गोष्टी- साने गुरुजी

माझे सत्याचे प्रयोग- मोहनदास करमचंद गांधी

गोष्टीरूप रामायण/ महाभारत

इसापच्या बोधकथा

एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर


Ref : Loksatta